
Today is the Birthday of a great Marathi poet, “Kusumagraj”. His contribution to the language as well as the literature has been so big, that his birthday is celebrated as “Marathi Language Day”. As a tribute to this towering personality of his field, I dedicate my post to him, and next what you all read is the language itself, Marathi.
आज मराठी भाषा दिवस आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस. त्यांना 1987 सालाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यांचा गौरव करण्यासाठी, सरकार ने त्यांचा वाढदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवलं. त्यांचीच एक कविता आज तुम्हा सर्व वाचकां पुढे मांडतो. तुम्हाला ती नक्कीच आवडेल.
सागर
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेस फुलांचे सफेत शिंपित, वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती, गात किनाऱ्याकडे
मऊ मऊ रेतीत रे कधी मी, खेळ खेळतो किती
दंगल दर्यावार करणाऱ्या वाऱ्याच्या संगती
ऊन सावळी विणते जेंव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते
तुफान केव्हा भांडत येतो, सागरही गरजतो,
त्या वेळी मी चतुर पणाने दूर जरा राहतो.
खडका वरुनी कधी पाहतो, मावळणारा रवी
धागा धागा ला फुटते तेव्हा, सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जाला खालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी.
दूर टेकडी वारी पेटती निळे , तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे
किती समकालीन वाटते ना ही कविता! अनेकानेक कृति मराठी भाषेला देणारे कवि कुसुमाग्रज ह्यांना फक्त आपण नमस्कार करू शकतो.
आज सर्व माय मराठीला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी जाणते – अजाणते व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करतो.
नमस्कार.