Posted in Uncategorized

मराठी भाषा दिवस


अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।
स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥
रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

आज दास नवमीमराठी भाषा दिवस आहे. रामदास स्वामींना नमस्कार करण्याचे भाग्य मराठी भाषा दिवस या दिवशी मिळावे हे आपल्या सर्वांचे भाग्यच. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस. आज काय लिहावे किंवा कोणत्या स्मृतींना उजाळा द्यावा हा मोठा प्रश्न पडला असून जास्त काही न लिहीता फक्त कवी सुरेश भट यांची कविता लिहीत आहे.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

अशा सर्व माय मराठीला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी जाणते – अजाणते व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करतो व माझ्या आजच्या संवादाला थांबवतो.

नमस्कार.

Author:

Am a teacher by profession. A student of History and international politics. Believe that Bhakti (Devotion) and Humanism can only save Humanity. Revere all creation. My thoughts are influenced by His Holiness Pandurang Shashtriji Athavale

8 thoughts on “मराठी भाषा दिवस

  1. अप्रतिम आणि सुरेख 👌

    धन्यवाद अमित !
    या दिवसाचा महत्त्व जाणून दिल्या बद्दल 🙌

    Liked by 1 person

Leave a Reply

Please log in using one of these methods to post your comment:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.